बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बौध्द तरुणाला मारहाण; ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
689

मुळशी (प्रतिनिधी) दि.२८ :- तालुक्यातील चांदे रोड या ठिकाणी टेम्पो मध्ये भाड्याचे बैल घेऊन जात असताना एका बौध्द तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर गून्हा दाखल करण्या ऐवजी उलट पीडित युवकावर गुन्हा दाखल केल्यामुळे ऑल इंडिया पँथर सेनेचे सर्वेसर्वा दिपकभाई केदार यांनी पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीसांना सहआरोपी करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकार व पुणे पोलिस प्रशासनाला केली आहे. केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित आकाश निवृत्ती शिंदे यांनी मा.राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे,मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,मा.जिल्हाधिकारी साहेब पुणे,मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे,उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली.गोऱ्हे बुद्रुक,वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब पौड पोलीस स्टेशन पौड यांना निवेदाद्वारे पोलीसांना सहआरोपी करून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पिडीत शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की,दिनांक १८/०८/२०२३ रोजी मला  टेम्पोचे भाडे असल्यामुळे तो चांदे रोड (ता-मुळशी जि-पुणे) येथून शेतीचे बैल घेऊन पुढे शेतकऱ्यांकडे देण्यासाठी जात होतो. कारण दि.१७/०८/२०२३ ते २७/०८/२०२३ पर्यंत रस्त्याचे काम चालू होते. म्हणून मी पर्यायी रस्त्याचा वापर केला. तसे निर्देश ग्रामपंचायत पिरंगुट(ता-मुळशी जि-पुणे) यांनी देखील काढलेले होते.नंतर दोन इसमांनी अडवणूक करून ते इसम बजरंग दलाचे कार्यकर्ते सांगू लागले.थोड्याच वेळात त्या इसमानी सदर ठिकाणी १०- १५ कार्यकर्ते बोलून घेतली.त्या ठिकाणी माझ्या गाडीची चावी घेण्यात आली.नंतर त्या इसमानी(बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी) गाडी आत मधून पाहिल्यानंतर माझ्या गाडीमध्ये बौद्धांची मूर्ती पाहिली.मूर्ती पाहिल्यानंतर मला मारहान करण्यात आली.मला अश्लील शिवीगाळ करण्यात आली.हे इसम इथेच थांबले नसून,मि घरी कोणालाही फोन करून घडलेली घटना सांगेन म्हणून ह्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी माझा मोबाईल हातातून इसकाउन घेतला.मला पाणी पिण्यासाठी  सुद्धा दिले नव्हते.नुकताच मी जनसेवा क्लिनिक खांबोली (ता- मुळशी,जि-पुणे)येथे दवाखान्यात ऍडमिट होतो.मी आजारी होतो तरीसुद्धा मला त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला माझी जात विचारून मला पाणी दिलेले नाही.तरी संबंधित बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला गाडीतले पाणी सुद्धा पिण्यास मनाई केली.भारत स्वतंत्र्योत्तर काळात अजूनही बौद्धांना पाणी दिले जात नाही.मरणाच्या भीतीने मि एकही शब्द न काढता मुकाट्याने त्यांच्या शिव्या ऐकू लागलो.मार खाऊ लागलो केवळ गाडीमध्ये बौद्धांची मूर्ती आहे हे पाहूनच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला वेठीस धरले.विशेष म्हणजे ज्या फिर्यादी दाराने माझी चुकीची फिर्याद दाखल केली तो फिर्यादी त्या जागेवर व त्या ठिकाणी हजर सुद्धा नव्हता.इतर ठिकाणी असताना देखील पोलिसांना हाताशी धरून तक्रार नोंदवली सबब फिर्यादी दाराचे कॉल रेकॉर्ड तपासले जावेत.
        पोलिसानी, महाराष्ट्र पशु अधिनियम १९७६ चे कलम ११,५, ९ हे कलम दाखल केले आसुन फक्त ५ किलोमीटर पर्यंत गाडी आडवुन सदरचा गुन्हा दाखल केला आहे.पण तीच गाडी तेच बैल त्याच अवस्थेत पोलिसांनी व बजरंग दलांच्या कार्यकर्त्यांनी ५० किलोमीटर पर्यंत गाडी चालवली. आर्टिकल १४ कायदा सर्वांना समान असल्याने पोलीस आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा तशाच प्रकारे गुन्हा दाखल झाला पाहिजे.
                  हे प्रकरण इथे थांबले नसुन.दि १८/०८/२०२३ रोजी पोलिसांना हाताशी धरून( पौड पोलिस स्टेशन अंतर्गत पुणे ग्रामीण पुणे)गुन्हा दाखल करण्यात आला.दि.१९/०८/२०२३रोजी में.तालुका न्यायालयाने सुद्धा मला जामीन मंजूर केला.मेहरबन कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यावर खूप ताशेरे ओढले. मेहरबन कोर्टाने सांगितले शेतकऱ्यांचा माल शेतकरी घेऊन जाणार.मेहरबान न्यायालयाने खोचक अशा भाषेत टिपणी केली की, या बौद्ध तरुणाकडे पाहून तुम्हाला वाटते का हे कापायला घेऊन जाणार आहे. हे तरुण असे दिसतात का ? अशा भाषेत टिप्पणी केली.उगाच काही तक्रार दाखल करता.अशा भाषेत मेहरबान न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले .
                 तरी मा. साहेब या संपूर्ण प्रकरणावरून असे दिसत आहे की, बौद्ध तरुणांची अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होत आहे.या भीतीमुळे बौद्ध तरुणाने एखादा व्यवसाय चालू करायचा का? नाही.बौद्ध तरुणांनी जगावं की मरावं फक्त गाडीत मूर्ति दिसली म्हणून बौद्ध तरुणाला अडकवलं जातयं.
          माझ्या गाडीचे बँकेचे हप्ते चालू आहेत.गाडीचे भाडे कधीतरी भेटतं.हप्ते थकलेले आहेत गाडी पोलिसांनी जमा केली.मी हप्ते कसे भरणार सतत आत्मदहनाचा विचार माझ्या मनामध्ये येऊ लागत आहे.या संविधान राष्ट्रात गरीबावर असे अन्याय पोलीस करत असतील तर आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा.Arumugam Servai vs State Of T.Nadu on 19 April, 2011 para १७ मध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत.माझ्यावर खोटे गुन्हे दाखल ज्यांनी केले आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे व पोलिसांनी संबंधितांना सहकार्य करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर संबंधित पोलीस कर्मचारी सुद्धा सह आरोपी झालाच पाहिजे.असे दोषारोपपत्र मेहरबान न्यायालयात दाखल झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलनास बसणार आहोत याची नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here