पिंपरी ( प्रतिनिधी ) – महापालिका सेवकांच्या पतंसस्थेत कर्ज पुरवठा करताना सत्ताधा-यांकडून पक्षपातीपणा करणे, कर्जाची अडवणूक करुन हेलपाटे मारावे लागणे, काही सभासदांना कमी कर्ज पुरवठा करणे, असा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. मात्र, प्रत्येक सभासदाला आम्ही विना जामिन.. मागेल त्याला कर्ज योजना राबविणार आहे. आवश्यक तेवढे कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक कर्जाची मर्यादा वाढविणार आहे, मुलींच्या लग्न कार्यालयास सुकन्या कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात येईल. याशिवाय पतसंस्थेचा राज्यात लौकीक वाढवून सर्व सेवा-सुविधा आॅनलाईन करण्यात येतील, त्यामुळे सभासदांनो.. आता विचार करा.. शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या उमेदवारांना मतदान करुन एक संधी द्या, त्या संधी आम्ही नक्की सोनं करु, असा विश्वास पॅनेल प्रमुख संजय ऊर्फ बापू जगदाळे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पंतसस्थेची पंचवार्षिक निवडणुकीचे उद्या मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मनपा मुख्य कार्यालयात मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे सत्ताधा-यांच्या विरोधात तरुण चेहरे निवडणूक मैदानात उतरले आहेत.
पॅनेल प्रमुख संजय जगदाळे म्हणाले की, महापालिका सेवक पतसंस्था ही आपल्या कर्मचा-यांची मातृसंस्था असून तीच्या स्थैर्यासाठी आमचं पॅनल काम करेल. सभासदांना कर्जावरील व्याज दर टप्या-टप्याने ९ टक्के करणे, सर्वांना कर्ज मर्यादेत वाढ करणे, सभासदांसाठी कुटुंबकल्याण सरंक्षण योजना राबविणे, सभासदांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुलभ करुन कर्ज मर्यादेत वाढ करणे, ऑनलाईन पध्दतीने सभासदांच्या खात्यावर थेट लाभांश जमा करणे, सोने तारण कर्ज सुविधा अधिक सुलभ करणे, मुलीच्या लग्न कार्यास सुकन्या योजना राबविणे, यासह सभासद हिताची लोककल्याणकारी कामे आम्ही करणार आहे.
पतसंस्थेचा कारभारात अनियमितता आढळून येत आहे. लेखापरीक्षणाचे आडीट रिपोर्ट उघड केले जात नाही. लेखापरीक्षणातील आक्षेप, नियमबाह्य कामकाज दडविले जात आहे. त्यावर सत्ताधारी पॅनेल चकार शब्द काढत नाही. त्यामुळे सभासदांनो.. पतसंस्थेत पारदर्शक कारभार, विकासाभिमुख निर्णय होण्याच्या दृष्टीने आम्ही पॅनल तयार केले आहे. पतसंस्थेतील एकाधिकारशाही, भ्रष्ट आणि मनमानी कारभारापासून अलिप्त ठेवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे. शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या सर्व उमेदवारांकडून पारदर्शक कारभाराची आम्ही हमी देतो. सर्व सभासद बंधू-भगिनीनो.. आमच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मतानी आपण विजयी करुन आम्हाला काम करण्याची संधी द्यावी, असेही आवाहन जगदाळे यांनी यावेळी केले.
हे आहेत आपले उमेदवार ..
सर्वसाधारण गटात ज्ञानेश्वर (अविनाश) इंगवले, परशुराम कदम, शंतनु कांबळे, बाळासाहेब कापसे, मनिष कुदळे, संतोष कुदळे, संजय जगदाळे, दत्तात्रय दुधे, इस्माईल शेख, महिला गटात माया वाकडे, अनुसूचित जाती-जमाती गटात प्रविण उघडे, इतर मागास वर्ग गटात हेमंत जाधव, भटक्या विमुक्त जाती गटात महेश कोळी हे उमेदवार आपले आहेत.