शून्य थकबाकी असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्था म्हणजे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार; अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे यांची माहिती

0
407

पिंपरी, दि. 9 – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या कारभार सन 2005-2006 पासून माझ्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सन 2005 पूर्वी पतसंस्थेत 65 टक्के थकबाकी होती. तसेच, बरेचसे कर्मचारी नोकरी सोडून गेले. सन 2005-2006 नंतर संस्था आमच्या ताब्यात आल्यानंतर सभासद, लेखा विभागाचे प्रमुख, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करुन पतसंस्थेची थकबाकी 0.003 टक्के केली. थकबाकी शून्य करण्यात यश आले आहे, असे स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे प्रमुख शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी रविवारी (दि.9) पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पॅनल प्रमुख शशिकांत झिंजुर्डे, मनोज माछरे तसेच पॅनल मधील उमेदवार सनी कदम, संदीप कापसे, गणेश गवळी, वैभव देवकर, विजय नलावडे, कृष्णा पारगे, भास्कर फडतरे, अभिषेक फुगे, विशाल भुजबळ, चंद्रकांत भोईर, नाथा मातेरे, शिवाजी येळवंडे, योगेश रानवडे, विश्वनाथ लांडगे, विजया कांबळे चारुशीला जोशी, अनिल लखन, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सन 2023-2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.11) मतदान होत आहे. स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनल प्रमुख बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली 19 उमेदवार कर्मचार्‍यांच्या हितासाठी व सेवेसाठी निवडणुकीस सामोरे जात आहेत.
बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले की, संस्थेचे कामकाज संगणकीकृत व स्वमालकीच्या 4 हजार चौरस फूटाच्या जागेत सुरू करण्यात आले आहे. सन 2006-7 व 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेला तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आदर्श पतसंस्था पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने सलग 4 वर्षे सर्वोत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दिपस्तंभ पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तत्पर सेवा व पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणुन सतत ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
पन्नास हजार रूपये कर्ज वितरण करणारी पतसंस्था 20 लाख पतपुरवठा करणारी राज्यातील एकमेव पतसंस्था आहे.

शहरातील सहकारी बँकांचा कर्जाचा व्याजदर 14 ते 15 टक्के आणि ठेवीवरील व्याजतर 7 टक्के आहे. पतसंस्थेचा व्याजदर 11 टक्के आणि ठेवीवरील व्याजदर 8.5 ते 10.50 टक्के आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 10 टक्के व्याजदराने कर्ज घेऊन, केवळ 11 टक्के दराने सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो.कर्जदार सभासदांच्या मृत्युनंतर संपुर्ण कर्ज माफ करणारी तसेच, त्या सभासदाच्या वारसास मयत निधी म्हणुन 10 हजार रूपये अंत्यविधीसाठी मदत दिली जाते. अशा प्रकारे मदत करणारी ही एकमेव पतसंस्था आहे, असे झिंजुर्डे यांनी सांगितले.
सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येतो. सलग 25 वर्षे पतसंस्थेचे सभासद असणार्‍या कर्मचार्‍यांना 5 हजार रूपयांची भेट स्वरुपात देण्यात येते. सभासदांना दिर्घमुदत कर्ज व तातडीचे कर्ज तात्काळ देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असते. संस्थेमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने निवडणुकीनंतर तात्काळ नोकरभरती करुन कामकाज गतीशील करण्यात येणार आहे. भविष्यकाळात 20 लाखांपेक्षा जास्त कर्ज मर्यादा वाढविण्याचा मानस आहे. सभासदांना 15 टक्क्यांपर्यंत लाभांश देण्याचा प्रयत्न आहे. कर्जावरील व्याजदर कमी करण्यात येईल, असे झिंजुर्डे यांनी सांगितले.

संस्थेचे कामकाज नियमानुसार सुरू आहे. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्या अफवाना सभासद भीक घालणार नाहीत, असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here