पिंपरी (दि.२) :- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द करणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटून खून केल्यासारखे आहे असे प्रतिपादन डॉ. कैलास कदम यांनी केले.
रविवारी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव डांगे चौक येथे खासदार राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधी घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी रुपये कुठून आले हा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घालून कामकाज तहकूब केले. यानंतर अवघ्या काही तासात सुरत येथील कनिष्ठ न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांचे रद्द केले याचा आधार घेत केंद्र सरकारने एकतर्फी निर्णय घेत राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द केले. याविषयी तीव्र प्रतिक्रिया देशभर उमटत आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ शहर काँग्रेसच्या वतीने नाशिक फाटा येथे सह्यांची मोहीम सुरू आहे. चिंचवड थरमॅक्स चौक येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आणि आज रविवारी डांगे चौक थेरगाव येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. या सर्व आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने एक लाख पोस्ट कार्ड केंद्र सरकारचा निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये सद्य परिस्थितीत नागरिकांना भेडसवणारे प्रश्न महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ याचा देखील उल्लेख करण्यात येणार आहे असेही काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेते गौतम अरकडे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, सज्जी वर्की, डॉ. मनिषा गरुड, निर्मला खैरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, डॉ. संदीप बाहेती, डॉ.अभिजीत बाबर, डॉ. मनोज राका, डॉ. भैरव माळी, अबूबकर लांडगे, शाम भोसले, उमेश बनसोडे, विजय इंगळे, किरण नढे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, रोहित शेळके, मिलिंद बनसोडे, रवि कांबळे, आकाश शिंदे, रवि नांगरे, संदीप शिंदे, अण्णा कसबे, दीपक भंडारी, सतीश भोसले, भास्कर नारखेडे, वसंत वारे आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.