‘पीसीसीओईआर’च्या शिरपेचात मानाचा तुरा ; इस्रोचा प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट नोडल पुरस्कार प्रदान

0
203

पिंपरी (दि.२):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या अभियांत्रिकी महविद्यालयाला भारत सरकार, अंतराळ विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), भारतीय सुदूर संवेदन संस्था ह्यांच्या वतीने देण्यात येणारा अखिल भारतीय स्थराचा मानाचा सर्वोत्कृष्ट असा भारतीय सुदूर संवेदन संस्था आय.आय.आर.एस. सर्वोत्कृष्ट नोडल केंद्र पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
२८ मार्च रोजी डेहराडून येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. आर.पी. सिंग, संचालक, आय.आय.आर.एस., डॉ. कलाचंद सैन, संचालक, डब्लू.आय.एच.जी., डेहराडून, डॉ. रणजित सिन्हा, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, उत्तराखंड सरकार, डॉ. एस.के. श्रीवास्तव, सी.जी.एम., आर.आर.एस.सी., एनआरएस.सी., नवी दिल्ली, डॉ. प्रमोद कुमार, डीन (शैक्षणिक), आय.आय.आर.एस. डेहराडून आदींच्या उपस्थितीत डॉ. सुदर्शन बोबडे यांनी पुरस्कार स्विकारला.
पीसीइटीच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना शिक्षण आणि संशोधनासाठी अनुकूल वातावरण आहे. ट्रस्ट नेहमी संशोधनासाठी भक्कम पाठबळ देत आहे. या पुरस्काराने पीसीओईआरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे अशी प्रतिक्रिया पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी डॉ. सुदर्शन बोबडे यांचे अभिनंदन करताना दिली. देशभरात कार्यरत असणाऱ्या ३२१४ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम केंद्रांमधून पीसीसीईओआरची निवड करण्यात आली आहे. वर्ष २०२२ साठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच अखिल भारतीय स्थराचा मानाचा सर्वोत्कृष्ट भारतीय सुदूर संवेदन संस्था (IIRS) आउटरीच नेटवर्क समन्वयक हा पुरस्कार पीसीसीओईआरचे
प्रा. डॉ. सुदर्शन बोबडे, सहयोगी प्राध्यापक व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख, यांना देण्यात आला. हे पुरस्कार रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस (RS & GIS) चा प्रचार समाजातील सर्व स्तरावर करून, समाज उपयोगी उपक्रमात सुदूर संवेदन व त्याचा वापर उत्कृष्टरित्या केल्या बद्दल, तसेच विद्यार्थ्यांसाठी भारतीय सुदूर संवेदन संस्थेचा (IIRS) दूरस्थ शिक्षण कार्यक्रम पोहचवण्या करिता देण्यात आला. पीसीइटीचे सर्व ट्रस्टी तसेच

महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रेरणा, पाठबळ मिळाले असल्याचे डॉ. बोबडे यांनी सांगितले. ओंकार भालेकर, साहिल साळवी व अक्षय राहणे यांची उपक्रमात साथ मिळाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here