लोणार (प्रतिनिधि ) दि.३० :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगामी १३२ व्या जयंतीनिमित्त नुकतीच वझर आघाव येथे जयंती उत्सव समिती २०२३ गठीत करण्यात आली. त्यानिमित्त झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रतन मोरे, उपाध्यक्षपदी सतीश मोरे, सचिवपदी समाधान डोके, कोषाध्यक्ष राहुल मोरे, तर व्यवस्थापक पदी अरुण मोरे यांची सर्वानुमते निवड झाली.
अन्य कार्यकारिणी अशी- सहसचिव सुरज पंडित साळवे, सदस्य संदीप रमेश मोरे,रोहित एकनाथ सेजुळ,सचिन संतोष साळवे,अशोक आमदास म्हस्के,अनिकेत गजानन साळवे,अमर संजय निकाळजे,साहिल परमेश्वर निकळजे,निखिल मोहन मोरे,हरीश वसंता मोरे,महेंद्र रमेश मोरे,संतोष सुखदेव मोरे,विजय गजानन साळवे,कुलदीप अशोक मोरे,अविनाश सिध्दार्थ मोरे इत्यादी सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या वेळी प्रकाश लिंबाजी मोरे ,अभिमान नाथा मोरे,रमेश अश्रुबा मोरे ,बळी भाऊ भिवासंन मोरे,समाधान गोविंद मोरे,संतोष संपत साळवे,गजानन प्रलाद मोरे,ब्रम्हा अशोक मोरे,विष्णू आत्माराम मोरे,समाधान शिवराम साळवे,सुखदेव भीमा मोरे,किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली. तसेच रुखिमिना हरिभाऊ मोरे,शालुबाई अभिमान मोरे,मधुराबाई भाऊराव मोरे,इंदुबाई नारायण डोके,वच्छला शेषराव मोरे,विमल प्रकाश मोरे या सर्वांच्या उपस्थित समितीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष रतन मोरे म्हणाले की,समाजामध्ये चांगला संदेश जावा या हेतूने 'एक वही एक पेन' दान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.जयंती न भूतो न भविष्यती असी साजरी केली जाईल.
वझर आघाव गावाला अनेक वर्षांची भीम जयंती ची परंपरा असून याही वर्षी धुमधडाक्यात जयंती साजरी करण्यात येणार आहे असे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी बैल गाडीतून मिरवणूक काढल्या जात असे. त्यावेळी बैलगाडीला सजवून त्यामध्ये मिरवणूक काढली जात असे.अधूनिकरणामुळे काळ बदलला त्यामुळे ट्रॅक्टर किंवा चारचाकी वाहनात मिरवणूक काढली जाते.