पुणे (प्रतिनिधी) :- सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या महात्मा फुले युवा दलाने पुणे जिल्हाप्रमुख पदाची निवड जाहीर केली आहे. सामाजिक कामात अग्रेसर असणारे प्रशांत डोके यांच्याकडे ही जबाबादारी संघटनेने सोपवलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अॅड. सतिष शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत डोके यांची पुणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. महात्मा फुले युवा दलाचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी तसेच संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे , गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याच्या सदिच्छा मान्यवरांनी प्रशांत डोकेंना दिल्या.
यावेळी महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अॅड सतिष शिंदे, महात्मा फुले युवा दल बीड जिल्हा प्रमुख अजय शिंदे उपस्थित होते. पुणे जिल्ह्यामध्ये महात्मा फुले युवा दलाचं काम जोमाने वाढावं, विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आणि सामाजिक कार्य नेटाने पुढे न्यावं, असं आवाहन सतिष शिंदे यांनी केले
संघटनेसाठी अहोरात्र कष्ट घेवून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचं नाव आणि काम घराघरा पोहोचवण्यासाठी आपण काम करु, असं आश्वासन प्रशांत डोके यांनी दिले. पुणे शहर जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याने प्रशांत डोके यांच्यावर पुणे जिल्हा आणि परिसतरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.