आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते एमआयडीसी परिसरात वृक्ष लागवड

0
263

पिंपरी चिंचवड :-  एमआयडीसी स्वच्छ एमआयडीसी हरित एमआयडीसी या अभय भोर यांच्या संकल्पने नुसार फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसी परिसरात भव्य वृक्षारोपण महानगरपालिका आयुक्त  राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

भोसरी एमआयडीसी परिसरात टी ब्लॉक येथे (दि.५) आयुक्त राजेश पाटील व उद्यान विभाग उपा आयुक्त इंगळे आणि शेकडो उद्योजकांच्या  उपस्थितीत भव्य वृक्षरोपण समारंभ संपन्न झाला. हा उपक्रम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग यांनी पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आला होता.  एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्यांनी आपल्या बाहेरील बाजूस सुशोभीकरण करण्यास सुरुवात देखील केली असून पर्यावरण संस्कार उद्यानाच्या बाहेरील बाजूस देखील  आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मेंबर नुटेक कपलिंग या कंपनी बाहेरील केलेल्या सुशोभीकरणाचे आणि माझी माझी एमआयडीसी स्वच्छ एमआयडीसी हरित एमआयडीसी या अभय भोर यांच्या संकल्पनेनुसार फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसी परिसरात भव्य वृक्षारोपण महानगरपालिका आयुक्त  राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

  एमआयडीसी परिसरात कामगारांच्या आरोग्यासाठी तसेच प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी आणि कंपन्या बाहेरील बाजूस सुशोभीकरण केल्यास नक्कीच शहराला एक वेगळे स्वरूप प्राप्त होईल. एमआयडीसी परिसरात २१००० झाडे लावण्याचा उद्दिष्ट करण्यात आलेले आहे. एमआयडीसी मध्ये प्रत्येक कंपनी बाहेर सुशोभीकरण करण्यासाठी अध्यक्ष अभय भोर यांनी पाठपुरावा चालू केला असून आणि कंपन्यांचा सहभाग यामध्ये वाढत आहे आज वृक्षारोपणामध्ये पर्यावरण उद्यानाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली.

याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर  न्यू टेक कंपनीचे डायरेक्टर. श्री बन्सी मंघानी डेक्कन मेकॅनिकल कंपनीचे उपाध्यक्ष श्री मिलिंद काळे . फोरम चे उपाध्यक्ष वैभव जगताप, श्री स्टॅम्पिंग कंपनीचे मॅनेजर विनायक बसरकर, दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष कु दुर्गा भोर, क प्रभाग आरोग्य निरीक्षक माने साहेब, कॉलिटी ऑटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर शिवाजी पाटील, मोंगा इंडस्ट्रीज चे जसबिंदर सिंग व उद्योजक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here