केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची फोनवरून  विचारपूस

0
724

चिंचवड | प्रतिनिधि | दि.१७ एप्रिल :- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप हे आजारी असून बाणेर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आमदार जगताप यांचे बंधू शंकर शेठ जगताप यांच्याशी फोनवर संपर्क साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वास्थ्याची विचारपूस करून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

रिपाई व भाजप यांची युती असल्यामुळे आठवले व जगताप यांच्या मध्ये घनिष्ठ संबंध आहेत. रिपाईचे पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी जगताप यांची तब्येत खालावली असल्याची माहिती आठवले यांना दिल्या क्षणी आठवले यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रथमच जगताप यांच्या प्रकृतीविषयी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी जाहीर माहिती दिलेली आहे. जगताप  रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाइंने ते आजारातून लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here