पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी घेतले स्टार्टअपचे धडे

0
380

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी मार्फत सूरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरला काळेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी भेट देवून उद्योग क्षेत्रात लागणा-या नवतंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअपचे धडे घेतले. अटल टिंच्युर लॅब अंतर्गत विद्यादीप माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ऑटो क्लस्टरमधील इनक्युबेशन सेंटर येथे गुरुवार, दि. ३१ रोजी अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये, ८ वी ते १० वी च्या ४० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, व्यवस्थापक उदय देव, शाळेचे संचालक अक्षय माने, मुख्याध्यापिका अर्चना दुधाळे, शिक्षिका शिल्पा मुळे, आदित्य् मासरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, एआय ऑटोमोटीव्ह, रेड कार्बन लॅब, होरायझन ग्राफिक्स, सेरेब्रोस्पार्क टेक, डेव्हलप ट्रेन मेंटेन, एआय, ड्रोन, व्हर्च्युअल रिअॅलिटी या तंत्रज्ञानासह ऑनलाईन शिक्षण प्रणालीची माहिती घेतली. सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. पिंपरी चिंचवड हे पुणे विभागातील आणि संपूर्ण देशातील प्रमुख औद्योगिक आणि आयटी हब म्हणून विकसित झाले आहे. तसेच, नवउद्योजकांची संख्या वाढीसाठी आणि अधिक उद्योजक निर्माण होण्यासाठी इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवतंत्रज्ञानाच्या आधारे प्रयत्न सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शालेय जिवनापासूनच उद्योजक होण्याचे ध्येय बाळगले तर नक्कीच यश मिळेल, असेही ते म्हणाले. प्रसंगी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला “ई-गव्हर्नन्स आणि इकोनोमी” पुरस्कार मिळाल्याबददल शाळेच्यावतीने स्मार्ट सिटी टीमचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन मिळाल्याबददल मुख्याध्यापिका अर्चना दुधाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here