लोककलांच्या माध्यमातून जागर जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

0
366

बीड, दि. 9 (जि. मा. का.) :- विद्यमान सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘आपला महाराष्ट्र आपले सरकार – दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित “लोककलांच्या माध्यमातून जागर” जनजागृती मोहिमेला आज जिल्ह्यात प्रारंभ झाला. या जनजागृती मोहिमेत दि. 9 मार्च रोजी सकाळच्या सत्रात जयभवानी कलापथकाने परळी तालुक्यातील रेवली, समता कलापथकाने गेवराई तालुक्यातील मादळमोही व तांबवेश्वर कलापथकाने केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे कार्यक्रम सादर केले.
 ग्रामीण भागात वासुदेव, पोतराज, लावणी, शाहिरीकला अशा अनेक लोककला संवादाचे साधन आहेत. मनोरंजनातून यथायोग्य संदेश देणं, हे या लोककलांचे वैशिष्ट्य. हाच हेतू समोर ठेवून जिल्ह्यात आजपासून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर सुरू झाला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध विकास कामे व योजना कार्यान्वित झाल्या आहेत. तसेच विद्यमान राज्य शासनाने कोरोना संकटात विकासाची अनेक कामे सुरु ठेवली आहेत. या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय, बीड यांच्या वतीने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या अंतर्गत जयभवानी कलापथकाने परळी तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतच्या सहकार्याने महादेव मंदिर येथे कार्यक्रम घेतला.यावेळी रेवली गावचे सरपंच मनोहरराव केदार, ग्रामपंचायत सदस्य शेषरावजी बनसोडे, रामान्‍ना कांदे, अर्जुन मुंडे, अंगद मुंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सिरसाळा येथील आंबेडकर चौक येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच रामदादा किरवले, माजी सरपंच विक्रम पठाण व मान्यवर उपस्थित होते. तसेच सायंकाळी गाढे पिंपळगाव येथे कार्यक्रम सादर केला.
 समता कला पथक यांनी गेवराई तालुक्यातील मादळमोही, सावरगाव येथे सकाळी व शिरस मार्ग येथे दुपारच्या सत्रात आणि टाकळगाव येथे सायंकाळच्या सत्रात कार्यक्रम सादर केले.  तांबवेश्वर कला पथक  यांनी केज तालुक्यातील कुंबेफळ , चंदन सावरगाव व सायंकाळी पिंपळगव्हाण येथे कार्यक्रम सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here