उन्हाळ्यात रोज नारळाचे पाणी पिण्याचे फायदे

0
390

उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी अतिशय उपयुक्त ठरू शकते. या ऋतूत रोज नारळ पाणी पिण्याची सवय लावली तर ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

. या ऋतूत रोज नारळ पाणी  पिण्याची सवय लावली तर ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. रोज सकाळी नारळपाण्याने दिवसाची सुरुवात केली तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत होईल आणि शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव  करण्यासह मदत होईल.

१) वजन कमी करण्यास होते मदत : रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर नारळ पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. नारळ्याच्या पाण्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते.

२)रोगप्रतिकार शक्ती होते मजबूत : नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते. नारळात सुमारे 600 मिलीग्राम पोटॅशियम आढळते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

३) डोकेदुखीच्या समस्येसाठी उपयुक्त : डिहायड्रेशनमुळे अनेकदा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होतो. अशा वेळी नारळाचे पाणी पिल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरुन काढली जाऊ शकते. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियमही आढळते. त्यामुळे सतत डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी नियमित नारळ पाणी पिल्यास त्यांची या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते.

४)रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास होते मदत : नियमित नारळ पाणी पिल्याने हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या अनेक रुग्णांना दररोज नारळ पाणी पिण्याची शिफारस केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here